Namaskar ghyava aho Buddha deva lyrics
Namaskar ghyava aho Buddha deva
Song :- Namaskar ghyava aho Buddha deva
Lyrics :- Mangesh Padgaokar
Singer :- Suresh Wadkar
Namaskar ghyava aho Buddha deva
नमस्कार घ्यावा, अहो बुद्ध देवा
घुमे प्रार्थना, अंतरी दीप लावा
नमस्कार घ्यावा, अहो बुद्ध देवा
हरा दुःख भ्रांती, तुम्ही दिव्य शांती
दिला या जगा, मंत्र कारुण्य सेवा
नमस्कार घ्यावा, अहो बुद्ध देवा
नसे भेद काही, आता खेद नाही
असा लाभला, थोर आनंद ठेवा
नमस्कार घ्यावा, अहो बुद्ध देवा
मने शुद्ध जेथे, वसे बुद्ध तेथे
नुरो या जगी, क्रूरता द्वेष हेवा
नमस्कार घ्यावा, अहो बुद्ध देवा
नमो शुद्ध रूपा, नमो आत्मदीपा
तमातून या मानवा मार्ग दावा
नमस्कार घ्यावा, अहो बुद्ध देवा