Gadit Ghya Ho Mala
Song :- Gadit Ghya Ho Mala, Gadiwaan Dada
Singer :- Shankar Mahadevan
Lyrics :- wamandada kardak
Gadit Ghya Ho Mala
थांबा हो थांबा गाडीवान दादा
करतो विनंती भिवा माझे नाव
राहिले फार दूर माझे गाव
गाडीत घ्या हो मला मला
गाडीत घ्या हो मला
गाडीवान बोले जात सांग बाला
दिसतो खरोखर तू लई भोला
भिवा बाळ बोले मी महार वेडा
गाडीवान बोले थांब बाल थोडा
बाटेल माझी गाडी आन मी
कसा घेऊ तुला मी तुला
गाडीत घ्या हो मला मला
गाडीत घ्या हो मला
दिवसाचा घोडा अस्तमान झाला
काळोख वाढे क्षणा क्षणाला
करावे कसे हे सुचे ना आम्हाला
दुपट्टीने भाडे देतो तुम्हाला
येऊ द्या दया हो या पामरांची
बसवूनी घ्या मला घ्या मला
गाडीत घ्या हो मला मला
गाडीत घ्या हो मला