Chandan Vruksha Saman Bhimgeet Lyrics


Chandan Vruksha Saman Bhimgeet Lyrics

चंदन वृक्षा समान होता भीमराव झिजला

Marathi Bhimgeet Lyrics


Singer-Suresh Wadkar

 

Song :- Chandan Vruksha Saman
Album :- Chandan Vruksha Saman
Singer :- Suresh Wadkar
Music :- Prabhakar Dhakde
Lyrics :- Rangaraj Lanjevar
Music Label :- T-Series

 

  Chandan vruksha saman hota 

Marathi Bhimgeet Lyrics

 

चंदन वृक्षा समान होता भीमराव झिजला -2
जीवन नौकेचा तो अमुच्या दीपस्तंभ ठरला 
चंदन वृक्षा समान होता

स्वानुभवाने दुख्खे अमुची जाणुनिया घेतली -2
विद्रोहाची फुले तयाने करात अमुच्या दिली
संघटनेचा संघर्षाचा -2 
कानमंत्र हि दिला
जीवन नौकेचा तो अमुच्या दीपस्तंभ ठरला 
चंदन वृक्षा समान होता

महाराष्ट्राच्या भूमी वरती धर्म युध्द घडविले -2
महाडातले तळे तयाने बंध मुक्त करविले
वैषम्याच्या बुरुज तटाला -2
सुरुंगहि लाविला
जीवन नौकेचा तो अमुच्या दीपस्तंभ ठरला 
चंदन वृक्षा समान होता

बहुजन हिताय बहुजन सुखाय घटना नव निर्मिली -2
न्याय, बंधुता, समता, नीती,तत्वे प्रतीपादिली
स्त्री शूद्रांच्या कल्याणाचा – 2
कायदाच घडविला
जीवन नौकेचा तो अमुच्या दीपस्तंभ ठरला  
चंदन वृक्षा समान होता


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *